टॅक्स चोरी रोखण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्डाला जोडलं जाणार?

आता, पॅन कार्ड धारकांना आधार कार्ड (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) अनिवार्य केला जाऊ शकतो. अर्थ आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 26, 2014, 04:30 PM IST
टॅक्स चोरी रोखण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्डाला जोडलं जाणार? title=

नवी दिल्ली : आता, पॅन कार्ड धारकांना आधार कार्ड (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) अनिवार्य केला जाऊ शकतो. अर्थ आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही परिस्थितीत एकाच व्यक्तीला दोन कार्ड दिले जाण्याची शक्यता टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काही जण एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवून टॅक्स चोरी करतानाही आढळतात. अशा परिस्थितीत पॅन कार्ड आधारकार्डाला जोडलं गेलं तर टॅक्स चोरी रोखण्यातही यश मिळू शकेल.  

ही सुविधा लवकरात लवकर प्रत्यक्षात लागू केली जावी यासाठी दोन्ही मंत्रालयांमध्ये उच्च स्तरावर चर्चाही सुरु आहे. त्यामुळे, येत्या वर्षांत या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.