नवी दिल्ली : यापुढे, सरकारी जाहिरातीवर नेते, मंत्री आणि मंत्र्यांच्या चमच्यांच्या फोटो दिसणार नाहीत... थॅक्स टू सर्वोच्च न्यायालय...
सरकारी जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला हा महत्त्वाचा निर्णय... न्यायालयाने सरकारी जाहिरातीवर पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि दिवंगत राष्ट्रीय नेते (उदाहरणार्थ- महात्मा गांधी) यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचेही फोटो लावण्यावर बंदी घातली आहे.
सरकारी जाहिरातीत मुख्यमंत्री, मंत्री किंवा कोणत्याही नेत्यांचे फोटो लावता येणार नाहीत, असं एका याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.
न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणी तीन सदस्यीय समिती नेमण्याचेही आदेश दिलेत. ही समिती न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होतंय किंवा नाही? याकडे लक्ष ठेवण्याचं काम करेल. त्यामुळे सरकारी जाहिरातींच्या स्पेशल ऑडिटचीही गरज लागणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.