नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीन देशांचा दौरा बुधवारपासून सुरू होतोय. आज सायंकाळी आज संध्याकाळी बिजिंगकडे रवाना होतील. या दौऱ्या दरम्यान मोदी चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या देशांना भेट देतील.
सर्वात सुरुवातील मोदी चीनला भेट देणार आहे. तर या दौऱ्याचा शेवट दक्षिण कोरियामध्ये होईल. या देशांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी अनेक करार होण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय.
मात्र, चीनसोबत असलेल्या सीमाप्रश्नावर यावेळी चर्चा होईल का? याबाबत मात्र मौन बाळगलंय. या प्रश्नावर दोन्ही देशांना अद्याप बरंच अंतर पार करायचंय, असं परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी म्हटलंय. या प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या १८ फेऱ्या झाल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.