लखनऊ : समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.
हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या भाजपच्या समर्थकांसमोर पतंप्रधानांनी समाजवादी पक्ष, बसपा आणि काँग्रेसवर मनसोक्त टीका केली. मला काळा पैसा हटवायचा आहे या पक्षांना मलाच हटवाचं आहे कारण माझ्यामुळे त्यांची खर्ची खाली केली आहे. उत्तर प्रदेशातल्या जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. पंतप्रधानांच्या या महारॅलीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सह पक्षातील अनेक बडे नेते उपस्थित होते.