सुरत : भुवनेश्वरमधील रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये मेगा रोड शो केला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये दोन दिवसीय दौ-यासाठी आलेल्या मोदींचं भव्य स्वागत यावेळी करण्यात आलं.
सुरतमध्ये विमानतळापासून सर्किट हाऊसपर्यंत अकरा किलोमीटरचा रोड शो मोदींनी केला. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी भव्य कटआऊट्स उभारण्यात आले होते. या रोड शोमध्ये जवळपास 25 हजार बाईक स्वार सामील झाले होते.. मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
तब्बल तीन तास हा रोड शो सुरु होता.. यावेळी संपूर्ण परिसर मोदी मोदीच्या घोषणांनी दणाणून गेल्याचं चित्र सुरतच्या रस्त्यावर पाहायला मिळालं.. याच वर्षी गुजरात विधानसभा निवडणूका येऊन ठेपल्यात.. त्यासाठी भाजपनं जय्यत तयारी सुरु केलीये... त्या धर्तीवर मिशन गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. पाटीदार समाजाच्या आंदोलनानंतर गुजरातमध्ये मोदींचा हा पहिलाच रोडशो होता...