नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजीटल पेमेंट लकी ड्रॉ काढताना विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी डिजीटल पेमेंट वाढविण्यासाठी भीम अॅपचेही लॉन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
- आजपण देशात सोने की चिडिया बनण्याची शक्ती आहे - मोदी
- चिंदबरम यांच्यावर निशाणा साधत मोदी म्हणाले, विरोधी म्हणतात खोदा पहाड निकली चुहिया, पण मला ही चुहियाच काढायची होती. शेतकरी मेहनत करतात आणि ही चुहियाच खाऊन जाते.
- असा एक काळ होता जेव्हा घोटाळ्यात इतके पैसे गेले अशी चर्चा होती. आता असा काळ आला आहे की किती पैसे जमा झाले अशी चर्चा होते.
- भीम अॅपच्या माध्यमातून २०१७ ची भेट देत आहे
- आज भारत बदलासोबत चालण्यास तयार आहे.
- निराशावादी लोकांसाठी माझ्याकडे कोणता इलाज नााही. आशावादी लोकांसाठी भरभरून देण्यासाठीआहे.
- शेअरबाजार सुरूवातीला बोलीवर चालत होतं. पण आता अब्जावधींचा व्यवहार डिजीटल झाला आहे.
- भीम अॅप गरीब, व्यापारी, शेतकरी आणि वंचितांना लाभ देणारे आहे.
- आता तो दिवस दूर नाही की सर्व लोक भीम अॅपने देवाण घेवाण करतील
- लवकरच अशी व्यवस्था आणणार की तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने पेमेंट करू शकणार.
- तुमचा अंगठा तुमचा व्यवसाय आणि तुमची ओळख होईल
- डिजीटल देवाण-घेवाणीसाठी आता इंटरनेटची गरज नाही
- १०० दिवसात ३४० कोटीची बक्षीस देण्यात
-डिजी धन योजनेचा बंपर ड्रॉ १४ एप्रिल २०१७ रोजी आंबेडकर जयंतीला