नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार हे सांगण्यात येतंय. यानुसार पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार मोदी आपल्या मंत्रीमंडळात अजून 12 नवीन मंत्र्यांचा समावेश करू शकतात. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून नव्या मंत्र्यांना सरकारमध्ये सहभागी करून घेतलं जावू शकतं. सध्या मोदींच्या कॅबिनेटमध्ये 44 मंत्री आहेत ज्यात 22 कॅबिनेट आणि 22 राज्य मंत्री आहेत.
नव्या चेहऱ्यांमध्ये हजारीबागहून भाजप खासदार जयंत सिन्हा यांना कॅबिनेटमध्ये जागा मिळू शकते. जयंत सिन्हा हे भाजपचे माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांचा मुलगा आहे. भाजपचे महासचिव जेपी नड्डा यांनाही मंत्रीमंडळात जागा मिळू शकते.
या मंत्रीमंडळ विस्ताराद्वारे मोदी काही वरिष्ठ मंत्र्यांचा भार कमी करू शकतात.
ज्यांच्याजवळ 2-3 मंत्रालयाचा भार आहे. जसं अरूण जेटली संरक्षण आणि अर्थमंत्री दोन्ही मंत्रालय सांभाळतायेत. या विस्तारात शिवसेना आणि अपना दल या पक्षांच्या खासदारांना जागा मिळू शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.