हनुमानगड: 'लहरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालो की हार नही होती' अशीच काहीशी हिंमत आणि जिद्द राजस्थानच्या एका महिलेनं दाखवली आहे. आठ महिन्यांची गर्भवती असणाऱ्या या महिलेनं पाच किलोमीटरचं अंतर चक्क ३४ मिनिटांत धावून पूर्ण केलं आहे.
माहितीनुसार सुमन पुनिया या महिलेनं पोलीस भरती परिक्षेसाठी घेण्यात आलेली पाच किमी धावण्याची स्पर्धा ३४ मिनिटांत पूर्ण केली. ज्यामुळे तिची पोलीस खात्यात निवड झाली आहे. सुमन लेखी परिक्षा या आधीच उत्तीर्ण झाली होती. सुमननं या धावण्याच्या स्पर्धेत अनेक मुलींना मागे टाकले होते. त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनीही सुमनची प्रशंसा केली.
सुमननं बोलतांना सांगितले की, या अवस्थेत धावणं मोठं आव्हान होतं, मात्र ते नोकरीच्या उद्देशानं ते गरजेचं होतं. यावेळी सुमनचं संपूर्ण कुटुंब तिथं उपस्थित होतं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुमनला धावण्यासाठी परवानगी दिली होती. सुमनचे वडील बीएसएफमध्ये आहेत, तर सासरे जेलर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.