वाढदिवशी मोदी आईच्या दर्शनासाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६४ वर्षांचे झालेत. याच निमित्तानं गांधीनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या आईची भेट घेण्यासाठी मोदी आज गुजरातमध्ये दाखल झालेत. 

Updated: Sep 17, 2014, 11:07 AM IST
वाढदिवशी मोदी आईच्या दर्शनासाठी  title=

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६४ वर्षांचे झालेत. याच निमित्तानं गांधीनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या आईची भेट घेण्यासाठी मोदी आज गुजरातमध्ये दाखल झालेत. 

जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार उडवणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतलाय. तसंच आपला वाढदिवस साजरा करण्यात येऊ नये, त्याऐवजी पूरग्रस्तांना मदत करा... असं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलंय.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आईला भेटलेत. बरोबर एक वर्षांपूर्वी मातोश्री हीराबा यांची भेट घेण्यासाठी मोदी आले होते. त्यावेळी आईनं आपल्या लाडक्या लेकाला पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद दिला होता. आता मोदी पंतप्रधानपदी विराजमान झालेत आणि पुन्हा एकदा त्यांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतलाय. यावेळी मोदींच्या आईने त्यांना मिठाई भरवत पाच हजार रुपये दिले. हे पैसे हीराबा यांनी काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले. कोणत्याही सुरक्षेविना सामान्य वाहनातून कुणाच्याही सोबतीशिवाय मोदी अहमदाबादहून २३ किलोमीटर दूर गांधीनगरला दाखल झाले.

या निमित्तानं हीराबेन यांनी जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधान मदतनिधीमध्ये पाच हजार रुपयांचं योगदान दिलं. 

वाढदिवसानिमित्त मोदींना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. हे दोन्ही नेत्यांमधली विशेष संबंधांचं प्रतिक मानलं जातंय. मोदींनी काही दिवसांपूर्वीच जपानचा दौरा केला होता.  

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही नरेंद्र मोदी यांनी फोन करून शुभेच्छा दिल्यात. तसंच उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनीही फोनवरून मोदींना शुभेच्छा दिल्या.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.