आझमगड : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहे. या यात्रेवेळी आझमगडमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी ओबामा आणि चीनच्या राष्ट्रपतींबरोबर सेल्फी काढायला परदेशामध्ये जातात, पण शेतकरी किंवा गरिबाबरोबर ते सेल्फी घेत नाहीत, कारण त्यांचा 15 लाख रुपयांचा सूट खराब होईल, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.
पंतप्रधानांबरोबरच राहुल गांधींनी समाजवादी पार्टी आणि बसपावरही टीका केली आहे. हत्तीला तुम्ही पळवून लावलंत, सायकल अडकली आहे, पुढेही जाऊ शकत नाही. आता हाताला साथ द्या. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु असं आश्वासनही राहुल गांधींनी दिलं आहे.