नवी दिल्ली : रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी अच्छे दिन आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार प्रथमच पूर्ण रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू भाडेवाढीपासून नागरिकांना दिलासा दिला आहे. तसेच तिकिट बुकिंग कालावधी दोन महिन्यांवरून वाढवला असून, आता ४ महिन्यांचा कालावधी करण्यात आलाय. प्रवाशांना चांगली सुविधा देण्यावर भर असेल. रेल्वेत स्वच्छतेवर भर दिला जाईल, असे सांगत कोणतीही नवी गाडी सुरु करण्यात आलेली नाही.
एका रात्रीत रेल्वेची स्थिती बदलणार नाही, असे सुरेश प्रभू यांनी सांगत मुंबई आणि कोकण यांच्या वाट्यासाठी या अर्थसंकल्पात आलेले नाही. त्यामुळे येथील प्रवाशांच्या तोंडाला पाने पुरसली आहे. आपण २० हजार सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला गेला आहे. काही तरी नवीन जोडावे लागेल, जुने तोडावे लागेल, सामर्थ्य दाखवावे लागेल, असे ते म्हणालेत. आगामी पाच वर्षांत रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेल्वे मंत्रालयावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आहे, त्यांना चांगल्या सेवेची अपेक्षा असे सांगत प्रभू यांनी रेल्वेच्या सुरक्षेला आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले.
प्रभू यांच्या भाषणातील ठळकबाबी -
। स्टेशन्सवर कॉर्पोरेट ब्रँण्डिग करून महसूल वाढवणार
। रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमणासाठी अधिकारी जबाबदार
। रेल्वे इंजीनचा आवाज कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान वापरणार
। रेल्वेच्या जमीनीवर 1 हजार मेगावॅटचे सोलर प्रकल्प उभारणार
। रेल्वेत जास्त आरामदायक सीट बनवणार
। व्हिल चिअरसाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा
। देशभरात १९०० हून अधिक आरओबी बांधणार, यासाठी ६ हजार कोटींचा निधी -
। रेल्वे मार्गांवरील लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यास प्राधान्य,
। मुंबई - दिल्लीसोबतच अन्य नऊ मार्गांवर हायस्पीड ट्रेन धावणार
। रेल्वेच्या विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) राबवणार
। रेल्वेचा योजना खर्च दुपट्टीने वाढणार
। स्टेशन्सवर कॉर्पोरेट ब्रँण्डिग करून महसूल वाढवणार
। IIT BHU मध्ये मदन मोहन मालवीय रिसर्च सेंटर
। ट्रेनची टक्कर होऊ नये साठी अलार्म बसविणार
। मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अहवाल ३ महिन्यात
। पूर्वेकडील आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य
। रेल्वेतील स्वच्छतेसाठी नवीन स्वच्छता विभाग
। मोठ्या शहरांमधील १० रेल्वे स्थानकांवर सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल करणार
। यावर्षी १७ हजार स्वच्छता गृहांचे बायो टॉयलेटमध्ये पुनर्विकास करणार
। जनरल गाडीचे डब्बे २४ ऐवजी आता २६ असतील
। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी १८२ हा क्रमांक असलेली हेल्पलाईन
। १३८ हा क्रमांक असलेली हेल्पलाईन देशपातळीवर सुरू करणार
। 'अ' दर्जाच्या स्टेशनवर वाय-फाय सुविधा
। प्रवाशांना गाड्यांच्या वेळेची माहिती एसएमसद्वारे देणार
। रेल्वेच्या जनरल डब्ब्यात वाढ करण्याचा निर्णय
। तिकिट बुकिंग कालावधी वाढवला, आता ४ महिन्यांचा कालावधी
। रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींच्या निवारणासाठी १ मार्चपासून मोबाईल अॅप सुरु करणार
। विनाआरक्षित तिकिटासाठी ऑपरेशन 5 मिनिट सुरू करणार
। निर्भया फंडमधील निधीचा वापर रेल्वेतून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी करणार
। प्रवाशांना चांगली सुविधा आणि स्वच्छतेवर भर देणार
। रेल्वेला स्वच्छ भारत अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न
। रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नाही
। रेल्वेत खासगी कंपन्यांकडून गुंतवणूक होणार, रेल्वेचे जाळे देशभरात पोहोचवणार
। रेल्वेत पार्टनरशिपची गरज, राज्य सरकारांसमवेत मिळून काम करण्याची गरज
। सुरक्षित आणि पायाभूत सुविधा पुरवणे हेच आमचे लक्ष्य
। भावी पिढीसाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे
। एका रात्रीत रेल्वेची स्थिती बदलणार नाही
। २० हजार सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश केला गेला आहे
। काही तरी नवीन जोडावे लागेल, जुने तोडावे लागेल, सामर्थ्य दाखवावे लागेल
। आगामी पाच वर्षांत रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार, यामध्ये कमी खर्च, यामध्ये भूसंपादनाची समस्या नाही, वेग वाढवल्यास वेळेतही बचत - सुरेश प्रभू
। रेल्वे मंत्रालयावर जनतेच्या अपेक्षांचे ओझे आहे, त्यांना चांगल्या सेवेची अपेक्षा
। गेल्या काही वर्षांत रेल्वेकडे दूर्लक्ष झाले
। रेल्वे ही पंतप्रधानांची प्राथमिकता
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.