नवी दिल्ली: अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेलं नसतं आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचं तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली 'तात्काळ स्पेशल' रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.
रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटाशी लढणाऱ्या रेल्वेनं वेगळा मार्ग स्वीकारलाय. तात्काळ भाड्याच्या आधारे ही विशेष रेल्वे चालवली जाईल. आता 'प्रिमियम' (दुरांतो एक्सप्रेस) मध्ये रेल्वेचं भाडं याआधारे ही सेवा सुरू आहे. नवीन तात्काळ रेल्वे सुरू झाल्यास गर्दीच्या वेळी प्रवाशांचा जास्त सुविधा मिळेल. या तात्काळ रेल्वेमध्ये प्रवाशांचा सामान्य भाड्यापेक्षा जास्त भाडं द्यावं लागेल. ते १७५ ते ४०० रुपयांदरम्यान असेल.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आता द्वितिय श्रेणीसाठी तात्काळचं भाडं हे सामान्य दराच्या १० टक्के जास्त आहे. याशिवाय एसी आणि इतर श्रेणींमध्ये हे भाडं ३० टक्के अधिक आहे. प्रिमियम रेल्वेसाठी फक्त ऑनलाइन तिकीट बुक केलं जावू शकतं. मात्र तात्काळ स्पेशल ट्रेनसाठी तिकीट ऑनलाइन आणि काउंटर दोन्ही ठिकाणी उपलब्ध असेल.
तात्काळ रेल्वेत आणि रिझर्व्हेशन करण्यासाठी थोडा दिलासा मिळालाय. आता कोणत्या ट्रेनमध्ये तात्काळ तिकीट २४ तासांपूर्वी बुक केलं जावू शकतं. मात्र या तात्काळ स्पेशल ट्रेनमध्ये रिझर्व्हेशन करण्यासाठी कमीत कमी १० दिवस आणि जास्तीत जास्त ६० दिवसांपूर्वी रिझर्व्हेशन करावं लागेल. अधिकारी म्हणाले, तात्काळ स्पेशल ट्रेनच्या तिकीट बुकिंगसाठी एक विशेष सॉफ्टवेअर तयार केलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.