मुफ्ती मोहम्मद सईद भारतीय आहेत का?- संघ

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे भारतीय आहेत की नाहीत, असा प्रश्न भाजपनं त्यांना विचारायला हवा, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या मुखपत्रातून मांडलंय.

Updated: Mar 8, 2015, 09:47 PM IST
मुफ्ती मोहम्मद सईद भारतीय आहेत का?- संघ title=

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे भारतीय आहेत की नाहीत, असा प्रश्न भाजपनं त्यांना विचारायला हवा, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या मुखपत्रातून मांडलंय.

आरएसएसच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रातून सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंह यांनी भाजपला हा प्रश्न केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं मुफ्ती सईद यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाबरोबर (पीडीपी) सत्ता स्थापन केली आहे. या युतीनंतर आता भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद होताना दिसत आहेत. कट्टर फुटीरतावादी नेता मसरत आलम याची सईद यांनी तुरुंगातून मुक्तता केली आहे. आलमवर देशाविरुद्ध युद्ध छेडण्याच्या आरोपासह एक डझनहून अधिक आरोप आहेत. यामुळं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सईद यांची भूमिका योग्य नसल्याचं म्हटलं आहे. 

जोगिंदर सिंह यांनी या लेखात लिहिलं आहे, की मुफ्ती यांनी दुहेरी भूमिका घेऊ नये. काश्मीर खोरे सोडून गेलेल्या हिंदू आणि शीख नागरिकांना पुन्हा आणण्यास सरकार प्रयत्न करणार आहे का? काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि दहशतवाद्यांमुळं शांततेत निवडणुका पार पडल्या, असं म्हणणाऱ्या सईद यांना भाजपनं हा प्रश्न विचारला पाहिजे. ते दुहेरी भूमिका घेऊन सत्ता करू शकत नाहीत. ते भारताशी एकनिष्ठ आहेत की नाही हेही पाहायला हवं.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.