www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोमवारी मार्केटमध्ये सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ढासळलाय. आता, एका डॉलरसाठी ६१ रुपये मोजावे लागणार आहेत. हा दर आजपर्यंतचा सर्वांत न्यूनतम दर आहे. गेल्या दोन दिवसांत रुपयानं ६० ची सीमारेषा आलांडली होती.
रुपयाच्या घसरणीचा फटका शेअर बाजारालाही बसला. सकाळच्या सत्रात विक्रीला उधाण आले आणि सेन्सेक्स २०० अंशांनी घसरला. निफ्टी ५८०० च्या स्तरावरुन खाली घसरला.
गेल्या आठवड्यात रुपया डॉलरच्या तुलनेत ६०.२३ रुपयांवर बंद झाला होता. अमेरिकेत वाढत चाललेला बेरोजगारीचा दर हा या घसरणीमागचं महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकन फेडरल बँकेनं वित्तीय प्रोत्साहन पॅकेजमध्ये कपात सुरु केलीय. गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजीही फेडरल बँकेनं हाच मार्ग स्वीकारला होता.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असतानाच भारताची आयात वाढू लागली आहे. विविध कारणांमुळे राजकोषीय तूट वाढत आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू असल्याचे जाणकारांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेकडून रुपयाला सावरण्यासाठी तातडीने ठोस उपाय झाले नाही तर अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडेल, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.