नवी दिल्ली : आयकर विभागाने नोटबंदीनंतर सहकारी बँकेच्या खात्यांमध्ये गडबड झाली असल्याची शंका व्यक्त केली आहे. आयकर विभागाने रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून अनेक सहकारी बँकेंच्या खात्यांमध्ये करोडो रुपयांची अवैध पद्धतीने देवान-घेवान झाली असल्याचं म्हटलं आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीमध्ये 2 विशेष प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई आणि पुणेमधील 2 प्रकरणांचा यात उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये 2 बँकांनी जमा होणारा काळापैशांमध्ये 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांमध्ये 113 कोटी रुपये अधिक असल्याची माहिती दिली आहे.
पुण्याच्या बँकेने रिजर्व्ह बँकेला 242 कोटी रुपयांच्या नोटा असल्याची माहिती दिली होती पण त्यांच्याकडे वास्तवात 141 कोटी रुपयेच होते. या सहकारी बँकेने 23 डिसेंबरला त्यांच्याकडे 101.70 कोटींच्या जुन्या नोटा असल्याचं म्हटलं होतं. मुंबईमध्ये अशाच प्रकारे एका प्रकरणात बँकेने 11.89 कोटी रुपयांची अधिक रक्कम असल्याचं म्हटलं होतं.
आयकर विभागाने मागील वर्षी नोटबंदीनंतर दोन्ही बँकांचा सर्वे केला. यादरम्यान नोटबंदीनंतर बँकेने त्यांच्याकडे असलेली रक्कम आणि रिझर्व्ह बँकेला दिलेली माहिती यामध्ये खूप तफावत असल्याचं समोर आलं आहे.
अधिकाऱ्यांनी म्हटलं की, याबाबत त्यांनी रिजर्व्ह बँकेला माहिती दिली आहे. जुन्या नोटांची उपलब्धतेपेक्षा अधिक जुन्या नोटा 30 डिसेंबरनंतरही बदलल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 500, 1,000 रुपयांच्या जुन्या नोटा नव्या नोटांमध्ये बदलण्यासाठी 30 डिसेंबर शेवटची तारीख होती. आयकर विभागाने याआधी ही सहकारी बँकाच्या कामकाजाबाबत गंभीर चिंता वर्तवली आहे.