नवी दिल्ली : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बॉर्डरवर गस्त घालत असताना भारतीय जवान चंदू चव्हाण चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर चव्हाण यांना पाकिस्तानी ताब्यात आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यांची सुटका पाकिस्तानने केली असून वाघा बोर्डवरुन ते भारतात परतणार आहेत.
पाकिस्तानातून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्याने 'सर्जिकल स्ट्राइक' करत हल्ला चढवला. यावेळी पाकचे अनेक बंकर उध्वस्त केलेत. यामध्ये काही हल्लेखोरांचा खात्माही केला. त्याचवेळी सीमेवर गस्त घालताना चंदू चव्हाण चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते.
Sepoy Chandu Babulal Chohan to be returned at 3 PM via Wagah Border, Punjab;he'll be debriefed & a spl medical check-up will be carried out.
— ANI (@ANI_news) January 21, 2017
चव्हाण कुटुंबीय तसेच देशासाठी आनंदाची बातमी आहे. जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमधून आज 3 वाजता मायदेशात परतणार आहेत. पाकिस्तानच्या सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं होतं. आता पाच महिन्यांनी त्यांची सुटका होतेय. वाघा बॉर्डरवरुन ते भारतात परत येणार आहेत. चंदू चव्हाण हे मूळचे धुळ्याचे आहेत.
#FLASH Pakistan to return Sepoy Chandu Babulal Chohan, who inadvertently crossed the LoC on 29 September 2016.
— ANI (@ANI_news) January 21, 2017