पोलीस ठाण्याजवळ माजी अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट, सापडली कंडोमची पाकिटे

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील अगमकुवा भागात पोलीस स्टेशनजवळ एका माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला आहे.

Updated: Mar 5, 2016, 10:44 AM IST
पोलीस ठाण्याजवळ माजी अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट, सापडली कंडोमची पाकिटे  title=

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील अगमकुवा भागात पोलीस स्टेशनजवळ एका माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरात सेक्स रॅकेट सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. पाटणासह येथे अन्य राज्यांतून मुली आणल्या जात होत्या आणि त्यांची बोली लावली जात होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार तरुणींसोबत पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे.

अगमकुवा भागातील एका शनीमंदिरामागील गल्लीत राजेश नावाच्या तरुणाने एका माजी आयएएस अधिकाऱ्याकडून त्याचा फ्लॅट भाड्याने घेतला होता, ज्यात तो सेक्स रॅकेटचा धंदा चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या मते येथे दूर दूरहून मुली आणल्या जात होत्या. हे लक्षात आल्यावर पोलिसांनी फ्लॅटची रेकी करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. या छाप्यादरम्यान काही जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. आलेल्या मुलींना कामोत्तेजक औषधे पाजून त्यांच्याकडून हे काम करवून घेतले जात होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याच छाप्यादरम्यान पोलिसांना या औषधांच्या बाटल्या तसेच अनेक कंडोमची पाकिटेही सापडली आहेत.

सध्या या ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणींकडे इतर चौकशी केली जात आहे. दरम्यान हे रॅकेट चालवणारा म्होरक्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी बिहार पोलीस सध्या ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

तसेच या फ्लॅटच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या छाप्यादरम्यान अटक करण्यात आलेला एक तरुण मनीष हा फ्लॅटमालकाचा पुतण्याच आहे. त्यामुळे या प्रकरणात हा माजी अधिकारीही सहभागी आहेत का, अशी शंका आता येत आहे.