www.24taas.com, नवी दिल्ली
दुष्काळावर राज्यसभेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारी योजनांवर खापर फोडलंय.
राज्यात योजनाचंच पीक आल्यानं समस्यांचं निवारण करता येत नाही, असं पवार यांनी राज्यसभेत म्हटलंय. असं विधान करुन शरद पवारांनी एकप्रकारे दुष्काळाचं खापर प्रशासकीय नियोजनावर फोडण्याचा प्रयत्न केलाय. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे अठराशे कोटींची मदत मागितली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत करीत असल्याचंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्रात पाहणी करण्यासाठी गेलेल्या समितीनं त्यांचा अहवाल सादर केला असून लवकरच त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असं शरद पवार यांनी सांगितलयं. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ असताना सरकारनं दुष्काळ निवारणासाठी काय केलं असा सवाल भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत उपस्थित केला होता.