'माकप'ची धुरा सीताराम येचुरींच्या हाती, सरचिटणीसपदी निवड

भारतीय कम्युनिस्ट पक्षा ( मार्क्सवादी)नं आज ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केलीय. विशाखापट्टणनमध्ये सीपीएमच्या राष्ट्रीय संमेलनात सीपीएमकडून प्रकाश करात यांनी या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले, पक्षानं सर्वसंमतीनं सीताराम येचुरी यांना सरचिटणीस निवडलंय. 

Updated: Apr 19, 2015, 11:16 PM IST
'माकप'ची धुरा सीताराम येचुरींच्या हाती, सरचिटणीसपदी निवड title=

विशाखापट्टणम: भारतीय कम्युनिस्ट पक्षा ( मार्क्सवादी)नं आज ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केलीय. विशाखापट्टणनमध्ये सीपीएमच्या राष्ट्रीय संमेलनात सीपीएमकडून प्रकाश करात यांनी या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले, पक्षानं सर्वसंमतीनं सीताराम येचुरी यांना सरचिटणीस निवडलंय. 

प्रकाश करात यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. या पदासाठी केरळचे वरिष्ठ सीपीएम नेते एस. रामचंद्रन सुद्धा दावेदार होते. मात्र अखेर पक्ष प्रतिनिधींनी सीताराम येचुरी यांच्यावर विश्वास दर्शवला.  

सरचिटणीस पदासाठी सीताराम येचुरी यांना पश्चिम बंगाल, त्रिपुरा यूनिट शिवाय अनेक हिंदीभाषिक राज्यांच्या सीपीएम यूनिटचंही समर्थन मिळालंय. येचुरी केरळ युनिटकडूनही काही प्रमाणात समर्थन घेण्यात यशस्वी ठरले. 

सीपीएममध्ये सरचिटणीस पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे ७४९ डेलीगेट्स गुप्त मतदान करतात. ज्यातील जवळपास साडे तीनशे डेलीगेट्स एकट्या केरळचे आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.