नेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित १३ हजार पानांच्या ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर माहिती मिळालीय की स्वतंत्र भारतात त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी केली गेली. १९४५च्या विमान अपघातात खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला का? यावर अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नाहीय. आता प्रत्येक फाईलच्या अभ्यासानंतर नवी माहिती पुढे येतेय.

Updated: Sep 22, 2015, 06:26 PM IST
नेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं? title=

नवी दिल्ली/कोलकाता: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित १३ हजार पानांच्या ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्या आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर माहिती मिळालीय की स्वतंत्र भारतात त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी केली गेली. १९४५च्या विमान अपघातात खरंच सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला का? यावर अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नाहीय. आता प्रत्येक फाईलच्या अभ्यासानंतर नवी माहिती पुढे येतेय.

मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार, नेताजी यांच्याबद्दलच्या ६४ फाइल्समधील इंटेलिजेंस रिपोर्टमधून माहिती मिळालीय की, नेताजी यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. या रिपोर्टमध्ये हे सुद्धा सांगितलं गेलंय की, नेताजींचा चेकोस्लोवाकिया इथल्या एका महिलेसोबत विवाह झाला होता. या महिलेपासून त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. तिचं नाव 'निमा' आहे. दरम्यान, हावर्ड विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक आणि नेताजी यांचे नातेवाईक असलेले सौगत बोस यांनी या रिपोर्टला बकवास म्हटलंय. तर दुसरीकडे एका स्कॉलरनं या रिपोर्टला खोटं म्हटलंय. या रिपोर्टनुसार नेताजींनी एमिली शेंकल यांच्याशी विवाह केला आणि त्यांना निमा नावाची मुलगी असल्याचं म्हटलंय.

आणखी वाचा - व्हिडिओ: नेताजींना काँग्रेसमधून निवृत्त का व्हावं लागलं? - अर्धेंदू बोस

नेताजी यांनी चेक गणराज्यातील महिलेशी विवाह केल्याचा आणि त्यांच्या मुलीचं नाव निमा असल्याचा उल्लेख सार्वजनिक केल्या गेलेल्या फाईल नंबर ४३च्या १९८ पानावर असल्याचं कळतंय. यावर १२ मे १९४८ तारीख लिहिली गेलीय. कोलकाता पोलिसांचे डेप्युटी कमिश्नर (स्पेशल ब्रांच)नं सीआयडी, आयजी आणि आयबी डायरेक्टरला एक सीक्रेट रिपोर्ट पाठवली. यात लिहिलं गेलंय, ही माहिती मिळालीय की, अरबिंदो बोस (नेताजीचे भाचे) १९४७ मध्ये स्टुडंट कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेण्यासाठी प्राग इथं गेले होते. तिथं अरबिंदो यांची भेट चेकोस्लोवाकियाच्या महिलेशी झाली. या महिलेनं नेताजींनी लिहिलेले तीन नोट्स अरबिंदो यांना दिले. या नोट्सच्या अखेरच्या भागात क्रिप्स मिशनचा उल्लेख होता. 

एका इंटेलिजंस ऑफिसरनं लिहिलेल्या एका नोटमध्ये असाही उल्लेख आहे की, या महिलेनं अरबिंदो यांना नेताजींनी स्वत: लिहिलेले काही लेख दिले. महिलेनं अरबिंदो यांना सांगितलं की, ते या डॉक्युमेंट्सचे दोन भाग पब्लिश करू शकतात. मात्र तिसरा भाग पब्लिश करू नये. या तिसऱ्या भागात लिहिलं होतं की, नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. 

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.