<b><font color=red>गुड न्यूजः</font></b> काँग्रेस युवराजाचा आदेश, सरकार देणार १२ सिलेंडर!

महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक गुड न्यूज.... सरकारने सब्सिडीच्या घरगुती सिलेंडरांची संख्या ९ वरून १२ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 17, 2014, 06:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक गुड न्यूज.... सरकारने सब्सिडीच्या घरगुती सिलेंडरांची संख्या ९ वरून १२ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
सब्सिडीच्या सिलेंडरची संख्या वाढविण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी घेतला आहे. दरम्यान, आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान महोदय देशातील सामान्य महिला ९ ऐवजी १२ सिलेंडरची मागणी करीत आहेत. आता नऊ सिलेंडरने काही काम चालणार नाही.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर हे निश्चित झाले की सरकार पाऊले उचलून सब्सिडीच्या सिलेंडरची संख्या ९ वरून १२ करणार.... त्यावर वीरप्पा मोईली यांनी सांगितले की, लवकरच या संदर्भात कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सादर करण्यात येईल.
दरम्यान, यापूर्वी असे बोलले जात होते की, सरकार सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सिलेंडरची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे काँग्रेसने नागरिकांना दिलासा देण्याचा विचार करीत आहे. महागाईमुळे पाच राज्यात पराभव झाल्याचे काँग्रेसचे मानणे होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.