नवी दिल्ली : लिंगनिदानासंदर्भातली कुठलीही माहिती आणि जाहिराती सगळ्या सर्च इंजिन्सनी ताबडतोब डिलीट करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
गुगल, याहू सारख्या सर्च इंजिन्समध्ये लिंगनिदानासंदर्भातली माहिती शोधली जाते. अशा प्रकारची कुठलीही माहिती आणि जाहिराती भारतात दिसता कामा नयेत, असं सुप्रीम कोर्टानं बजावलंय.
यासंदर्भात टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्र आणि वेबसाईटसवर नजर ठेवण्यासाठी केंद्रानं एका समितीची नियुक्ती करण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं दिलीय. लिंगनिदानासंदर्भातही माहिती किंवा जाहिराती कुणालाही आढळल्यास या समितीशी संपर्क साधावा, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.