www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशात जातीय दंगली भडकवणाऱ्यांना माफी देणार नसल्याचा इशारा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलाय. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये नॅशनल इंटिग्रेशन काऊन्सिल म्हणजेच राष्ट्रीय एकता परिषद सुरू झालीय. त्यात केलेल्या भाषणात त्यांनी हा इशारा दिलाय.
जातीय दंगल किंवा तेढ निर्माण करणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तसंच भारतात सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काही प्रसंगी जातीयवादी शक्ती हिंसा भडकवण्यात यशस्वी होतात,त्यांना कठोर शिक्षा करण्यास आणि शांतता सुव्यवस्था राखण्यास सरकार बांधिल असल्याचं देखील त्यांनी प्रतिपादन केलंय.
मुझफ्फरनगरच्या दंगलीत बनावट व्हिडिओ पसरवून दंगल घडवल्याचं त्यांनी म्हटलंय. या दंगलीत बऱ्याच मोठया प्रमाणावर जिवीत हानी झालीय. गेल्या काही महिन्यात काश्मिर आणि आसाम इथं सुद्धा जातीय दंगली झाल्या आहेत. या दंगलीच्या घटनां घडू नये याकरीता सरकार प्रयत्न करत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरूय. दंगलीच्या घटनांना हातळतांना कोण्यातही प्रकारचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलयं.
भाजपचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मात्र या बैठकीला गैरहजर आहेत. भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री या परिषदेला उपस्थित नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.