मुंबई : वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ हिच्याबद्दल आता एक धक्कादायक खुलासा झालाय. राधे माँला तीन मुलं आहेत... तिचा सेवक म्हणून काम करणारा गौरव कुमार उर्फ टल्ली बाबाही तीचाच मुलगा असल्याचं आता पुढे येतंय.
टल्ली बाबा हा राधे माँचा सर्वात खास सेवक असल्याचं तिच्या वर्तुळातून समजतंय. हा टल्ली बाबाच राधे माँचा मुलगा आहे. तर याच वर्तुळात वावरणारी छोटी माँ ऊर्फ ऋतू सरीन ही राधे माँची छोटी मुलगी असल्याचंही म्हटलं जातंय.
अधिक वाचा - जय हो राधे माँ की...
एका प्रॉपर्टीच्या प्रकरणातील कागदपत्रांमुळे हा खुलासा झालाय. मुंबईतील जवळपास 75 करोड रुपयांची ही प्रॉपर्टी आहे. याच्याशी निगडीत कागदपत्रांमध्ये राधे माँचा मोठा मुलगा हरजिंदर यानं टल्ली बाबा याला आपला सख्खा भाऊ आणि छोटी माँ ही आपली बहिण असल्याचं म्हटलंय.
त्यामुळे, हे दोघं खरंच राधे माँची मुलं आहेत की केवळ काळा पैशांच्या प्रॉपर्टीमध्ये दिशाभूल करण्यासाठी हा दावा करण्यात आलाय, हे चौकशीनंतरच समोर येऊ शकेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.