'...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन'

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक धक्कादायक वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी, सरळ सरळ मीडियाला धमकीच देऊन टाकलीय. 'जर राज्याचा अपमान करत राहाल तर मीडियाला जमिनीत 10 फूट खोलवर गाडून टाकलं जाईल' असं राव यांनी म्हटलंय. 

Updated: Sep 10, 2014, 11:42 AM IST
'...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन' title=

वारंगल : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक धक्कादायक वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी, सरळ सरळ मीडियाला धमकीच देऊन टाकलीय. 'जर राज्याचा अपमान करत राहाल तर मीडियाला जमिनीत 10 फूट खोलवर गाडून टाकलं जाईल' असं राव यांनी म्हटलंय. 

तेलंगणाचा 'सन्मान' केला जावा, अशी मागणी राव यांनी केलीय. जे तेलंगणा, त्याचं अस्तित्व आणि प्रतिष्ठेचा अपमान करतील त्यांना जमिनीत 10 फूट खाली गाडलं जाईल, असं राव यांनी एका कार्यक्रमात म्हटलंय. 

राव यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांनी टीका केलीय. मुख्यमंत्र्यांनी संयम बाळगावा, असा सल्ला त्यांनी राव यांना दिलाय.  

राज्याच्या अनेक केबल ऑपरेटर्सनं 16 जूनपासून दोन टीव्ही चैनल 'एबीएन आंध्र ज्योति' आणि 'टीव्ही 9'चं प्रसारण रोखलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दोन चॅनल्सनं तेलंगणाविरुद्ध अपमानजनक कार्यक्रम दाखवले होते... हे सगळं सुरु असतानाच राव यांनी हे वक्तव्य केलंय. 'मी केबल ऑपरेटर्सना सेल्यूट करतो ज्यांनी हे केलंय... जर ते चॅनल्स सुधारले नाहीत तर आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवू' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

या दरम्यान, या दोन्ही चॅनल्सच्या अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम स्थळाच्या बाहेर निदर्शनं करत या दोन्ही चॅनल्सचं प्रसारण पुन्हा सुरू करण्याची मागणी केलीय. 

काही दिवसांपूर्वी, पहिल्या राज्य विधानसभेत एक प्रस्ताव पारित करून अध्यक्षांनी या टीव्ही चॅनलविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. चॅनलवर आमदारांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.