श्रीनगर : दक्षिण काश्मीरमध्ये पुलवाला जिल्ह्यात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीआरपीएफच्या एका शिबिरावर हा हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोख उत्तर दिलं. त्यानंतर हे दहशतवादी फरार झाले. पण यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
रात्री जवळपास ८ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या १८२ व्या बटालियन शिबिरावर हल्ला केला. त्यानंतर एक पोलिसांची टीम लगेचच त्यांच्या मदतीसाठी तेथे पोहोचली. त्यानंतर प्रत्त्यूत्तर देतांना दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला.