जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला भागात अतिरेकी दडून बसलेलं घर लष्करानं उडवून दिले. हिज्जबुल मुजाहिद्दीन संघटनेचे दोन अतिरेकी या घरात दडून बसले होते.
गेल्या २४ तासांपासून त्यांची लष्करासोबत चकमक सुरू होती. जवानांनी वारंवार शरण येण्याचं आवाहन करूनही अतिरेकी बधत नव्हते. अखेर लष्करानं स्फोटकांनी हे घरच उडवून दिले. या घटनेत अद्याप कोणी जवान जखमी झाल्याचं वृत्त नाही.
दरम्यान, श्रीनगर येते लष्कराने राबविलेल्या दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीत झाला. तर चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.