नवी दिल्ली : आज सकाळी ६.३० च्या सुमारास मुंबईतल्या 1993 बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमन फासावर चढवण्यात आलं. दोन तास अगोदर स्वतंत्र भारताच्या इतिहासात घडल्या नाहीत अशा काही घटना घडल्या.
बुधवारी रात्री 10 वाजता राष्ट्रपतींनी याकूबची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर याकूबच्या वकिलांनी याकूबच्या बचावासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'बचावा'चा प्रयत्न केला. पण, यात त्यांना यश मिळालं नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच देशातल्या सर्वोच्च न्यायालायनं पहाटे चार वाजून अठ्ठवन्न मिनिटांनी याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं.
सकाळी ११ वाजता (२९ जुलै) : मेमनकडून १४ पानांची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयाकडे सोपवण्यात आली.
दुपारी ४ वाजता (२९ जुलै) : राष्ट्रपतींनी आवश्यक त्या कारवाईसाठी याकूबची दया याचिका गृह मंत्रालयाकडे पाठवली.
रात्री ८.३० वाजत (२९ जुलै) : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राष्ट्रपती भवनाकडे धाव घेतली आणि याकूबचा दया याचिका अर्ज फेटाळण्यात यावा, हे सरकारचं मत राष्ट्रपतींपर्यंत पोहचवलं.
रात्री ९.१५ वाजता : केंद्रीय गृह सचिव एलसी गोयल आणि सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार हे राष्ट्रपती भवनात उपस्थित झाले.
रात्री १०.४५ वाजता : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबची दया याचिका फेटाळून लावली.
रात्री १०.४५ वाजता : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि आनंद ग्रोवर यांनी सर न्यायाधीश एच एल दत्तू यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली... आणि याकूबच्या डेथ वॉरंटवर स्टे आणण्याची याचिका दाखल केली.
रात्री ११.३० वाजता : सुप्रीम कोर्टाने तीन न्यायमूर्तींचं बेंच स्थापन करुन सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. इतर न्यायमूर्ती न्या. दत्तू यांच्या घरी हजर झाले.
मध्यरात्री १.०० वाजता (३० जुलै) : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या घरी हा सगळा ताफा दाखल झाला.
मध्यरात्री १.३० वाजता : दोन्ही बाजुंचे वकील न्या. मिश्रा यांच्या घरी दाखल झाले.
मध्यरात्री १.३५ वाजता : न्या. मिश्रा, प्रफुल्ल चंद्र पंत आणि अमित्व रॉय या तीन न्यायमूर्तींनी रात्री २.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचं ठरलं.
मध्यरात्री २.१० वाजता : नागपूर मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं नागपूरातील एका हॉटेलात थांबलेल्या मेमन बंधुंना एक पत्र दिलं.
मध्यरात्री २. ३० वाजता : सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती हजर झाले. पण, अॅटर्नी जनरल मुकूल रोहतोगी यांना यायला उशीर झाल्यानं सुनावणीला थोडा उशीर झाला.
मध्यरात्री ३.२० वाजता : याकूबच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. यावर सुनावणी सुरु होताच याकूबच्या वकिलांनी याकूबला १४ दिवसांची मुदत मिळावी अशी मागणी केली.. तर १४ दिवसांची मुदत एकदाच मिळते वारंवार नाही असा युक्तीवाद सरकारी पक्षानं केला.
मध्यरात्री ४.५० वाजता : कोर्टानं याकूबची दया याचिका फेटाळून लावलीॉ
सकाळी ७.०० वाजता : याकूब मेमनला फासावर चढवण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.