नवी दिल्ली : देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. याच दिवशी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला होता. त्यामुळे १५ ऑगस्ट दरवर्षी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.
मात्र तुम्हाला माहीत आहे का, १५ ऑगस्ट केवळ भारत देशाचाच स्वातंत्र्यदिन नाहीये तर अन्य तीन देशही यादिवशी स्वतंत्र झाले होते. हे तीन देश म्हणजे दक्षिण कोरिया, बहारिन आणि कांगो. या तीनही देशांनाही आजच्याच दिवशी स्वातंत्र्य मिळाले होते.
दक्षिण कोरियाला १५ ऑगस्ट १९४५ मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. तर बहारिन देशाला १५ ऑगस्ट १९७१ आणि कांगो १९६०मध्ये फ्रान्सच्या जोखडातून मुक्त झाला होता.