www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
सरकारी कर्मचारी आता वयाच्या ६२ वर्षांपर्यंत नोकरी करू शकेल. कारण सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ वर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत उद्या (१५ऑगस्ट) घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
निवृत्ती वय ६२ वर्षे अशी घोषणा झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती खूशखबर ठरणार आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचार्यां चे निवृत्ती वय ६० वरुन ६२ वर्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. केंद्रीय मार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सोमवारी याबाबतच्या प्रस्तावाला अंतिम रुप दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ वर्ष करण्यातबाबत १५ ऑगस्टला लाल किल्यावरील पंतप्रधांनांच्या भाषणात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्माचारी वयाच्या ६२ व्या वर्षांपर्यंत नोकरी करू शकेल.
या आधी एनडीए सरकारच्या कार्यकाळात १९९८ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्षे करण्यात आले होते. तर चीनसोबतच्या युध्दांनतर जवाहरलाल नेहरु यांनी १९६२ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढविली होती. ५५ वरुन निवृत्तीचे वय ५८ वर्षे केले होते.
अन्य देशांचा विचार करता भारतात निवृत्तीचे वय कमी आहे. निवृत्तीचे वय ६० तर अन्य देशांमध्ये सरासरी ६२ ते ६५ वर्षे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुरूषांचे ६५ तर महिलांचे ६३, ऑस्ट्रीयात पुरूषांचे ६५ तर स्त्रियांचे ६०, झेक प्रजास्ताकमध्ये पुरूष -६२, स्त्री- ६१, स्वाझलॅंडमध्ये पुरूषांचे ६५ तर महिलांचे ६४ वर्षे आहे. जर्मनी, आईसलॅंड, कॅनडा, मेस्कीको, पोर्तुगाल, स्पेन, डेन्मार्क या देशांत (पुरूष -६५, स्त्री- ६५,) ६५ वर्षे वयोमर्यादा आहे. तर युनायटेड स्टेटमध्ये ६६ तर नॉर्वेमध्ये ६७ वर्षे आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.