www.24taas.com, झी मीडिया, उन्नाव
दोन दिवसात फक्त १०२ सेंटीमीटर... उन्नावमध्ये सुरू असलेल्या खोदकामाची ही आहे प्रगती... साधूच्या स्वप्नाला खरं मानून खोदकाम सुरू केलेल्या पुरातत्व विभागाला या १०२ सेंटीमीटरच्या खोदकामात फक्त एक भिंत मिळालीय.
या जमिनीखाली १००० टन सोनं आहे दडलं आहे असा दावा होतोय. एका साधूच्या स्वप्नात हे दिसल्यावर पुरातत्व विभागानं उन्नावच्या किल्ल्यात खोदकामाला सुरूवात केलीय. गेल्या चार दिवसांपासून खोदकाम केल्यावर पुरातत्व विभागाच्या टीमचं फावडं एका मोठ्या दगडाला आपटलं.. मात्र सावधानतेनं खोदकाम केल्यावर खाली फक्त एक मोठी भिंत मिळालीय.
खोदकाम पूर्ण होण्यास साधारणतः १ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाचा खोदकामाचा वेगही मंद आहे. कारण जमिनीखाली दडलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या ऐतिहासिक ऐवजाला धोका पोहोचवायचा नाहीये. ३ दिवसांत फक्त १०२ सेंटीमीटरचं खोदकाम झालंय.
एकीकडे खोदकाम सुरू आहे. तर राजा रामबक्शच्या या किल्ल्याला आता जत्रेचं स्वरूप आलंय. त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. खोदकाम करताना एएसआयच्या टीमला जमिनीखाली काही जुनी भांडीही मिळाली आहेत. ४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारं खोदकामावर लक्ष ठेवण्यात येतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.