मुजफ्फरनगर: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा मिळालाय. मुजफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भडकाऊ भाषणाबाबत दिलासा देत मुजफ्फरनगर कोर्टानं दाखल झालेली चार्जशीट कोर्टाला परत पाठवलीय.
कोर्टानं सांगितलं की, या चार्जशीटमधील काही बाबींवर कोर्टाचा आक्षेप होता. सांगण्यात आलंय चार्जशीटमधील कलमांतर्गत लावलेले आरोप खरे नव्हते. जर अमित शहांवर चार्जशीटमध्ये लागलेले आरोप सिद्ध झाले असते, तर त्यांना 3 वर्षांची शिक्षा झाली असती.
चार्जशीटमध्ये पोलिसांनी तपासादरम्यान अमित शहा यांच्यावर अनेक गंभीर कलम लावली होती. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अमित शहा यांनी मुजफ्फरनगरमध्ये अनेक ठिकणी सभा घेतल्या होत्या. त्याच सभांमध्ये भडकाऊ भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
मुजफ्फरनगरसह शामली आणि बिजनोरमध्ये पण अमित शहा यांच्या विरोधात गुन्हे दाखल होते. मुजफ्फरनगरच्या नई मंडी क्षेत्रातील एका हॉलमध्ये अमित शहा यांनी 4 एप्रिल 2014ला एक सभा घेतली होती. आरोप आहे की, अमित शहा यांनी यात भडकाऊ भाषण दिलं होतं, ज्याच्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे 12 एप्रिलला गुन्हा नोंदवण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.