मुंबई: एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे. डीसीबी बँकेनं ही सुविधा सुरु केली आहे. आधार कार्डाशी जोडल्या गेलेल्या या प्रक्रियेमध्ये ग्राहकांना पासवर्डऐवजी आपल्याबाबतची बायोमेट्रीक माहिती ट्रान्जक्शन करताना द्यावी लागणार आहे.
एटीएममध्ये आलेला ग्राहक आधार कार्डावरचा 12 आकडी नंबर टाकू शकतो, किंवा आधार कार्ड स्वॅप करु शकतो. हे केल्यानंतर पासवर्ड म्हणून ग्राहकाला त्याच्याबाबतची बायोमेट्रीक माहिती द्यावी लागेल. यानंतर स्कॅनरवर ग्राहकाला आपलं बोट ठेवावं लागेल, त्यानंतर एटीएम मशीनमधून पैसे येतील.