नवी दिल्ली : ज्या ज्या वेळी एक्झिट पोल घेण्यात येतो. तो खरा होतोच असे नाही. यामध्ये सर्वाधिक पोल हा चाणक्याचा चुकीचा ठरला आहे. त्यामुळे त्यांनी बिहारमध्ये दिलेला कौल आधीचा इतिहास पाहता चुकीचा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीशकुमार-लालूप्रसाद यांचेच राज्य येण्याची अधिक शक्यता अन्य एक्झिट पोलने वर्तविली आहे. ती खरी ठरण्याची अधिक दिसत आहे.
महाराष्ट्र विधानसभा : २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा : टुडेज चाणक्य एक्झिट पोलने भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त होता. मात्र, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वाधिक जागा १२१.
दिल्ली विधानसभा : फेब्रुवारी २०१५ च्या 'चाणक्य'च्या एक्झिट पोलमध्ये 'आप' ला तब्बल ४८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. भाजपला २२ जागा तर काँग्रेस खातेही उघडू शकणार नसल्याचा चाणक्यचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, भाजपला मोठा धक्का बसला आणि आपने मोठी कामगिरी करीत विक्रमी आणि स्पष्ट बहुमत मिळविले. त्यामुळे हाही पोल खोटा ठरला.
बिहार विधानसभा : नोव्हेंबर २०१५ च्या 'चाणक्य'च्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपला कौल देताना बहुमत मिळेल असे म्हटले आहे. मात्र, अन्य एक्झिट पोलने भाजपला कौल दिलेला नाही. मात्र, महाआघाडीला कौल दिलाय. त्यामुळे 'चाणक्य'चा पोल पुन्हा खोटा ठरणार की खर याची उत्सुकता ८ नोव्हेंबरला संपेल.
लोकसभा निवडणूक : २०१४ च्या 'टुडेज चाणक्य' या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर जनमत चाचणीत लोकसभेच्या जागांपैकी ३४० जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. या निष्कर्षांनुसार सत्ताधारी यूपीएला अवघ्या ७० जागांवर समाधान मानावे लागेल तर अन्य पक्षांच्या वाट्याला १३३ जागा येतील, असे म्हटले होते. टाइम्स नाऊ वाहिनीसाठी "ओआरजी' या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २४९ तर यूपीए आघाडीला १४८जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. अन्य पक्षांना मिळून १४६ जागा मिळतील. म्हणजेच रालोआला बहुमताचा २७२ हा जादुई आकडा गाठण्यासाठी २३ जागा कमी पडतील, असा अंदाज टाइम्स नाऊने व्यक्त केला होता. मात्र, त्यांचा अंदाज चुकला.
कोणी केलाय सर्व्हे | एनडीए | महाआघाडी | अन्य |
इंडिया टुडे -सिसरो | १११-१२७ | ११०-१२४ | ०४-१४ |
न्यूज नेशन | ११५-११९ | १२०-१२३ | ०३-०५ |
इंडिया टीव्ही-सी व्होटर | १०१-१२१ | ११२-१३२ | ०६-१४ |
टाइम्स नाऊ - सी वोटर | १११ | १२२ | १० |
न्यूज एक्स | ९०-१०० | १३ | १२-२३ |
एबीपी-नेल्सन | १०८ | १३० | ०५ |
टुडेज-चाणक्य | ११५ | ८३ | ०५ |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.