नवी दिल्ली : मॅगीवरुन वादळ उठल्याने केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या ग्राहकांची फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये दोषींना जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद असणारा एक नवीन कायदा करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असे केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.
घातक जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या गोंधळून टाकणाऱ्या जाहिराती करण्यात सहभागी असणारे लोकही नव्या कायद्यानुसार जन्मठेपेसारख्या शिक्षेला जबाबदार असतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय.
शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटॅमिक अॅसिडचे जादा प्रमाण असलेल्या मॅगी नूडल्स प्रकरणाचे उदाहरण पासवान यांनी दिले. धोकादायक अन्न पदार्थासाठी कठोर कायदेशीर तरतूद करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तू आणि धोकादायक खाद्य उत्पादने यांची निर्मिती आणि प्रसिद्धी यात सहभागी असणाऱ्या लोकांविषयी कोणतीही दया दाखविली जाणार नाही, असे स्पष्ट बजावले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.