लखनऊ : ओपी चौधरी हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी एका डॉक्टरला नर्स सोबत एका खोलीत विचित्र अवस्थेत पाहिल्यावर पत्नी भडकली आणि तिने डॉक्टरला चप्पलने मारणे सुरू केले. नर्सने या प्रकारचा विरोध केला.
त्यानंतर नर्सच्या मदतीने डॉक्टरने पत्नीला बेदम मारहाण केली. सुमारे तासभर हा ड्रामा सुरू होता. पोलिसांनी तक्रार दाखल करून डॉक्टरला अटक केली. हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टर आणि नर्स या दोघांना निलंबित केले आहे.
ओपी चौधरी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर कॅन्सर विभागात काम करणारे डॉ. जे.पी. गुप्ता शनिवारी सायंकाळी सहाय्यक नर्ससोबत एका खोलीत होते. या दरम्यान डॉक्टरांची पत्नी पूनम गुप्ता या ठिकाणी पोहचली केबिनच्या दरवाज्याला धक्का दिला.
गुप्तांना नर्ससोबत विचित्र अवस्थेत पाहिले आणि भडकली. चप्पल घेऊन पळाली आणि पतीला चांगलाच चोप दिला. आरडाओरड पाहून हॉस्पिटलचे कर्मचारी पळत आले. यानंतर डॉक्टर आणि नर्सने स्वतःला सावरले आणि पत्नीला मारहाण करायला लागले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.