वर्ल्ड रेकॉर्ड! किडनीतून निघाला ७०० ग्रामचा स्टोन

दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महफूज अहमद नावाच्या व्यक्तीच्या किडनीतून जगातला सर्वात मोठा किडनी स्टोन काढण्यात आलाय. ९ सेमी व्यासाच्या या स्टोनचं वजन तब्बल ७०० ग्राम आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 16, 2014, 08:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महफूज अहमद नावाच्या व्यक्तीच्या किडनीतून जगातला सर्वात मोठा किडनी स्टोन काढण्यात आलाय. ९ सेमी व्यासाच्या या स्टोनचं वजन तब्बल ७०० ग्राम आहे.
श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांच्या मते महफूज यांची किडनीतून तब्बल पाच स्टोन काढण्यात आले. ज्यांचं वजन ८०० ग्राम इतकं आहे. हॉस्पिटलचा दावा आहे की हा स्टोन जगातला आतापर्यंतचा सर्वात मोठा किडनी स्टोन आहे.
हॉस्पिटलतर्फे आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणार आहे. महफूज यांना किडनी स्टोन असल्याचं एक्स-रेमध्ये निर्दशनास आलं. हा स्टोन मोठा असल्याचंही डॉक्टरांना जाणवलं. त्यामुळं त्यांनी त्वरीत ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मात्र महफूजची आर्थिक स्थिती पाहता हॉस्पिटलनं कोणत्याही प्रकारची फी न घेता हे ऑपरेशन केलं. आता महफूज यांना ३-४ दिवसांत डिस्चार्ज मिळणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.