नवी दिल्ली : आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला.
काँग्रेस आणि भाजपनं आपल्याला कधीच बेईमान म्हटलं नाही. मात्र स्वकीयांनीच आपल्याला बेईमान ठरवल्याची खंतही केजरीवाल यांनी यानिमित्तानं बोलून दाखवली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला हरवण्याची रणनिती प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांनी आखली होती. अशी टीकाही केजरीवालांनी केली. आपचा प्रचार करण्यासाठी भूषण यांची मनधरणी करावी लागत होती, असा आरोपही त्यांनी केला.
भूषण यांच्यामुळेच आपल्याला तिहार तुरुंगात जावं लागल्याचा आरोपही केजरीवालांनी केला. त्यावेळी पटियाला कोर्टात त्यांनीच आपल्याला पर्सनल बाँड भरायला नकार दिल्याचंही ते म्हणाले. आम आदमी पक्षाची हत्या करु नका, असं आवाहनही केजरीवाल यांनी यानिमित्तानं केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.