व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी आलेल्या तरूणाची हत्या

युवतीसोबत 'व्हॅलेंटाइन दिवस' साजरा करण्यासाठी आलेल्या युवकाचा खून झाला आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर हा तरूण गुडगावला आला होता.

Updated: Feb 15, 2016, 11:07 PM IST
व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी आलेल्या तरूणाची हत्या title=

गुडगाव : युवतीसोबत 'व्हॅलेंटाइन दिवस' साजरा करण्यासाठी आलेल्या युवकाचा खून झाला आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर हा तरूण गुडगावला आला होता.

दिल्ली येथे राहत असलेला २७ वर्षांचा ईश्वर हा आपल्या फेसबुकवरील मैत्रिणीसोबत व्हॅलेंटाइन दिवस साजरा करण्यासाठी गुडगावला आला, मात्र दोन व्यक्तींनी त्याला बेदम मारहाण केली. 

ईश्वरच्या मैत्रिणीने सांगितले की, फेसबुकच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यांपासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. व्हॅलेंटाइन दिवस साजरा करण्यासाठी ईश्वर माझ्याकडे आला होता. यावेळी माझा मेव्हणा रमेश आणि त्याचा चालक अनिलकुमार यांनी त्याला मारहाण केली होती.

गंभीर जखमी झालेल्या ईश्वरला एका इमारतीजवळ टाकण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सुरू आहे.