दुग्ध उत्पादनात कोणाचा आहे 'हातखंडा'?

जगात शेतीमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते इस्राइलचं आधुनिक पद्धतीने शेतीची कायपालट जशी या देशानं केली त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसायातही या देशानं तंत्रज्ञानामध्ये मोठं यश मिळवलं आहे.

Updated: Mar 2, 2012, 09:47 AM IST

www.24taas.com, विक्रम काजळे, इस्राइल

 

जगात शेतीमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते इस्राइलचं आधुनिक पद्धतीने शेतीची कायपालट जशी या देशानं केली त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसायातही या देशानं तंत्रज्ञानामध्ये मोठं यश मिळवलं आहे. इस्राइलमधल्या अफिमिल्क या संस्थेने दुग्धउत्पादनामध्ये मोठी उल्लेखनीय कामगिरी केल्याने या संस्थेचं तंत्रज्ञान अवघ्या जगाने स्विकारलं आहे. इस्राइलची लोकसंख्या एकुण ७८ लाख इतकी आहे तर तिथल्या गायींची संख्या १ लाख २० हजार. म्हणजेच प्रत्येक ६५ माणसांमागे एक गाय आहे. असं असलं तरी इथल्या नागरिकांना मुबलक दुध मिळतं. कारण इस्राइलची एक गाय सरासरी ३५ लिटर दुध देते.

 

इस्राइलयच्या अफीमिल्क या संस्थेने यांत मोठी भुमिका निभवली आहे. कारण गायींची संख्या वाढत असतांना. गायींच्या व्यवस्थापनेचा ताणही वाढत होता. मात्र याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नव्हता.  कारण कमी मनुष्यबळातलचं व्यवस्थापन शेतकऱ्यांन आर्थिकरित्या फायदेशीर ठरणारं होतं. अशातच अफीमिल्कचं संशोधन इस्राइलमधल्या शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनासाठी मौलिक ठरलं.

 

अफिमिल्क या किबितुझ मधल्या  इली पीलीस या शेतकऱ्यानं १९७६ च्या कृषी प्रदर्शनात इलेक्ट्रोनिक मिल्क मिटरची निर्मिती जगासमोर मांडली. यासंशोधनामुळे मोठ्या प्रमाणात दुधाच्या किटल्यांना सहज फाटा मिळणार होता. आणि दुधाची हातळणी कमी श्रमात होणार होती. त्यावेळचं हे संशोधन म्हणजे जगातल्या गतीच्या तुलनेत हे १० वर्षानंतरचं संशोधन होतं.

 

एवढंच नाही तर इली पीलीसने १९७९ मध्ये  मस्टायटीस म्हणजेच स्तनदाह हा आजार होण्याआधीच त्याचं निदान करता येईल हेही शोधून काढलं तसेच दुधाची विद्युत वाहकताही शोधून काढली यासाठी इली पीलीसला तर अमेरिकन पेटंटही मिळाला. या संशोधनामुळे इस्राइलमधील दुग्ध उत्पादनाला वेग आला. दरम्यान कमी मनुष्यबळात गायींचं संगोपन करण्याचा विचार वाढीस लागला. अफिमिल्कनं पुढे पीडोमिटरचीही निर्मिती केली. वाढत्या गायींच्या संख्येवर आता संगणकाच्या माध्यमातून निगराणी सुरु झाली. आणि इस्राइलच्या दुग्ध उत्पादनाला वेग आला.

 

गायींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आल्यानं गायींच्या आरोग्य आणि दुध उत्पादन वाढीसाठी असणाऱ्या बाबी अभ्यासात आल्या आणि शेतकऱ्यांचं दुध उत्पादन वाढतचं गेलं. आजही अफीमिल्कचं संशोधन हे अग्रक्रमावर असून अवघ्या जगातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतं आहे.