'पाकिस्तान आंतरराष्ट्रीय डोकेदुखी'

उग्रवादी, गरिबी आणि ढेपाळलेलं सरकार अशी अवस्था असलेलं पाकिस्तान साऱ्या जगाचंच डोकेदुखी ठरतंय, आणि अमेरिकाही इथले प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडतंय, असं म्हटलंय अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री मेडली अलब्राईट यांनी. अलब्राईट या सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

Updated: Jun 26, 2012, 10:48 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली    

उग्रवादी, गरिबी आणि ढेपाळलेलं सरकार अशी अवस्था असलेलं पाकिस्तान साऱ्या जगाचंच डोकेदुखी ठरतंय, आणि अमेरिकाही इथले प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडतंय, असं म्हटलंय अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री मेडली अलब्राईट यांनी. अलब्राईट या सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या संबंधांचं श्रेय मात्र त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश यांना दिलंय. नवी दिल्लीमध्ये २०१२: राजनैतिक बदलावाचं एक वर्ष या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी हे विधान केलंय. जातीयवादी संघर्ष, भारत-पाकिस्तानमधील दुरावा, दक्षिण चीन सागरातील युद्ध हे २१ व्या शतकातील जगासमोर असलेले मोठे प्रश्न आहेत असं त्यांनी म्हटलंय.

पाकिस्तान ही आंतरराष्ट्रीय डोकेदुखी ठरू लागलंय. इथं गरिबी, दहशतवाद, अण्वस्र प्रसारबंदीचे प्रश्नसारखे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांना सोडविण्यासाठी प्रश्नासन मात्र दुर्बल ठरतंय. बिल क्लिंटन यांच्या काळात विदेश मंत्रालयाचा कारभार हाताळणाऱ्या अलब्राइट यांनी ‘व्यापारी संबंध जोडणारा भारत मात्र या डोकेदुखीवर औषध शोधून काढू शकतं’ असंही आपल्या शैलीत सुचवलंय.

.