हिमांगिनीने जिंकला 'मिस एशिया पॅसिफिक'चा किताब

मिस एशिया पॅसिफिक-२०१२चा मुकूट इंदूरस्थित हिमांगिनी सिंग हिच्या डोक्यावर सजला. गेल्या १२ वर्षांमध्ये हा मुकूट जिंकणारी हिमांगिनी ही पहिली भारतीय आहे.शनिवारी दक्षिण कोरियामधील बुसान शहरात आयोजित केलेल्या मिस एशिया पॅसिफिक-२०१२ च्या सोहळ्यात भारताचं नाव गाजवलं.

Updated: Jun 19, 2012, 04:23 PM IST

www.24taas.com, बुसान

मिस एशिया पॅसिफिक-२०१२चा मुकूट इंदूरस्थित हिमांगिनी सिंग हिच्या डोक्यावर सजला. गेल्या १२ वर्षांमध्ये हा मुकूट जिंकणारी हिमांगिनी ही पहिली भारतीय आहे.शनिवारी दक्षिण कोरियामधील बुसान शहरात आयोजित केलेल्या मिस एशिया पॅसिफिक-२०१२ च्या सोहळ्यात भारताचं नाव गाजवलं.

मिस एशिया पॅसिफिक-२०१२चा किताब जिंकल्यावर हिमांगिनी म्हणाली, की हे सगळं एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. माझ्या मेंटॉर्सनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच मी आज हा किताब जिंकू शकले. हिमांगिनीला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्यात माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन  हिच्या 'आय ऍम शी' या संस्थेचा मोठा वाटा आहे. आपली निवड योग्य ठरल्याचा सुष्मिता सेनला अभिमान वाटत आहे, असं तिने सांगितलं.

हिमांगिनीच्या आधी १२ वर्षांपूर्वी दिया मिर्झा या मॉडेलने २००० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता. दिया मिर्झा आज एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. हिमांगिनी सिंग यादू इंदूरच्या इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीजमध्ये बीसीएचा अभ्यास करत आहे. २००६ मध्ये हिमांगिनीने ‘मिस इंदूर’चा किताब पटकावला होता.