लंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरासाठी 41 कोटींना मंजुरी

लंडनमध्ये शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते, ती वास्तू विकत घेण्यासाठी 41 कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. 

Updated: Feb 3, 2015, 03:23 PM IST
लंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरासाठी 41 कोटींना मंजुरी  title=

मुंबई : लंडनमध्ये शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते, ती वास्तू विकत घेण्यासाठी 41 कोटी रुपयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. 

तब्बल ४१ कोटी रूपयांना ही वास्तू सरकार विकत घेणार आहे. लंडनच्या किंग हेन्री रोडवर ही २ हजार चौरस फुटाची वास्तू आहे. १९२० च्या दशकात डॉ. आंबेडकर लंडन 'स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिकत असताना या घरात राहत होते. 

अलिकडेच सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी बुद्धिस्ट सोसायटीच्या सदस्यांसह लंडनच्या या घराला भेट देऊन ती वास्तू विकत घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या वास्तूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.