www.24taas.com, झी मीडिया, लंडन
‘घरातले सर्व दागिने दिले नाहीस तर सेक्स टेप फेसबुकवर अपलोड करेन’ अशी धमकी देऊन एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या ठगाला तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेलीय.
केवळ २० वर्षांचा असलेल्या आमिर खान यानं १६ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देण्याचं सत्र सुरू केलं होतं. ही घटना आहे २००९ सालची... हा खटला ब्रिटनच्या लेसिस्टर कोर्टात सुरू होता. आमिरनं संबंधीत मुलीला तिच्या आईचे सोन्याचे दागिने आपल्या ताब्यात देण्यास सांगितले. मुलीनं जेव्हा याला नकार दिला तेव्हा त्यानं मुलीचा त्याच्यासोबतचा सेक्स टेप फेसबुकवर उघड करण्याची धमकी दिली. तसंच हा टेप तुझ्या आई-वडिलांना पाठवेन अशीही धमकी त्यानं तिला दिली होती. एका अवखळ क्षणी गाडीमध्ये असताना ही मुलगी आमीरच्या खूप जवळ आली होती आणि आमिरनं त्याचा गैरफायदा घेतला. त्याचवेळी त्यानं हा सेक्स टेप बनविला होता.
धमकी दिल्यानंतर मुलीनं तिच्या आईचे जवळजवळ १५,००० पाऊंडस् (१३,६९,८२३.७० रुपये) चे दागिने आमिरच्या स्वाधीन केले. बेडरूमची खिडकी खोलून ती हे दागिने खाली फेकत असे आणि खाली उभा असलेला आमिर ते दागिने आपल्या ताब्यात घेत होता.
या प्रकरणात आमिरनं आपला गुन्हा कबूल केलाय. त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.