अमेरिकेचे खासदारही करतात मोदींची प्रशंसा

अमेरिकेच्या एका खासदारांनी नरेंद्र मोदींना दूरदृष्टीचे राजकारणी म्हणून संबोधलं आहे. त्याच प्रमाणे मोदी हे भारतात एका नव्या युगाची सुरूवात करतील, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे. या कारणाने मोदींची आता अमेरिकेत ही स्तुती होऊ लागली आहे

Updated: May 21, 2014, 02:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमेरिका
अमेरिकेच्या एका खासदारांनी नरेंद्र मोदींना दूरदृष्टीचे राजकारणी म्हणून संबोधलं आहे. त्याच प्रमाणे मोदी हे भारतात एका नव्या युगाची सुरूवात करतील, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला आहे. या कारणाने मोदींची आता अमेरिकेत ही स्तुती होऊ लागली आहे.
अमेरिकाचे खासदार एफ.एच फैलोमावेगा यांनी अमेरिकाच्या प्रतिनिधी सभेत सांगितलं की, `मोदी हे दूरदृष्टी ठेवणारे व्यक्ति आहेत. ते भारताच्या प्रत्येक नागरिकास सोबत घेऊन काही तरी वैशिष्टपूर्ण काम करतील.
भारताला याच कारणाने एक चांगलं भाग्य मिळणार आहे. यात कुठलीही शंका नाही की, मोदी एका नवीन युगाचा प्रारंभ करतील. ते एकविसाव्या शतकाला भारताचं शतक बनवतील, म्हणजेच २१ शतकावर भारताचं वर्चस्व राहील. हे त्यांच भाग्यच आहे.
अमेरिकाच्या समाओमधून निवडून आलेले खासदार फैलोमावेगा यांनी सांगितलं की, ` मी भारताचे भावी पंतप्रधान यांना शुभेच्छा देण्यासाठी येथे उभा आहे. त्यांनी एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १६ मे २०१४ रोजी भारतात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आणि स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच गैर काँग्रेस सरकारने आपल्या शक्तीवर बहुमताने विजय मिळवला आहे. याचं संपूर्ण श्रेय नरेंद्र मोदींनाच आहे.`

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.