वॉशिंग्टन : अंतराळात एक नवा धोका उद्भवलाय. अमेरिकन डिफेन्स सॅटलाईट अंतराळातच फुटलीय. त्यामुळे, पृथ्वीलाही त्याचा धोका निर्माण झालाय.
अमेरिकन डिफेन्स सॅटेलाईटचा स्फोट झाल्यानं या सॅटेलाईचे जवळपास 100 तुकडे झालेत. हे तुकडे कोणत्याही क्षणी स्पेसक्राफ्टला टक्कर देऊ शकतात. अमेरिकन सॅटेलाईटचा स्फोट झाल्यानं युरोपीय स्पेस एजन्सीसहीत इतर एजन्सीजही सतर्क झाल्यात.
हे अमेरिकेचं 20 वर्षांपूर्वीचं हवामानाची माहिती देणारं सॅटेलाईट होतं. अचानक तपमान वाढल्यामुळे या सॅटेलाईटच्या इलेक्ट्रीक सिस्टममध्ये स्फोट झाल्याचं सांगण्यात येतं. अंतराळात झालेल्या या स्फोटामुळे युरोपियन स्पेस एजन्सीसहीत इतर एजन्सीजही धास्तावल्यात.
डिफेन्स मेटियोरोलॉजिकल सॅटेलाईट प्रोग्राम फ्लाईट 13... म्हणजेच 'डीएमएपी-एफ 13'चा तीन फेब्रुवारी रोजी स्फोट झाला होता. ही सॅटेलाईट कोणत्याही बाहेरच्या वस्तूला धडकल्यामुळे याचा स्फोट झाला नाही, असं संशोधनकर्त्यांनी स्पष्ट केलंय.
अमेरिकेनं 1995 मध्ये अंतराळात सोडलेलं हे सॅटेलाईट पृथ्वीपासून 800 किलोमीटर दूरवर एका ग्रह कक्षेत होतं. 2006 पर्यंत तिथं राहण्यासाठी हे सॅटेलाईट सक्षम होतं. ते अजूनही अंतराळात उपस्थित होतं पण, सध्या मात्र त्याचा वापर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी होत नव्हता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.