मुंबई: ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.
आतापर्यंत इंटरगव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंजेस (IPCC)२०१३च्या रिपोर्टच्या आधारे बर्फ वितळण्याच्या आकड्यांवर काळजी व्यक्त केली होती. मात्र सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या नवीन आकडेवारीनुसार अंटार्टिकामध्ये १९९२ पासून २००१ पर्यंत बर्फ ११२ बिलियन टननं वाढत होती. तर २००३ ते २००८ दरम्यान दरवर्षी ८२ मिलियन टनानं बर्फ वाढलाय. हे पाहता नासा २०१८मध्ये नवीन सॅटेलाइन लॉन्च करणार आहे. त्यामुळं अधिक चांगली माहिती आणि आकडेवारी मिळेल. तर दुसरीकडे संशोधक थोडे चिंतेतही आहेत. कारण ग्लेशियरचा थर वाढल्यानं समुद्राची लेव्हल वाढू शकते. त्यामुळं अनेक बेटांवर परिणाम होऊ शकतो.
नासाच्या ग्रीनबेल्ट (मॅरीलँड)मध्ये असलेल्या गोबार्ट स्पेस फ्लाइट सेंटरच्या ग्लेशियॉलॉजिस्ट जे वॅली यांच्यानुसार, 'इतर रिपोर्ट्सचा दावा आहे की, अंटार्टिकाच्या अंटार्कटिक पॅनिनसुला आणि पाइन आइसलँडमध्ये बर्फ झपाट्यानं वितळत आहे. मात्र आम्ही पाहिलंय की, प्रत्यक्षात असं नाहीय. पूर्व अंटार्टिका आणि पश्चिम अंटार्टिकच्या आतील भागांमध्ये इतर क्षेत्रांच्या तुलनेनं आम्हाला अधिक बर्फ मिळाला' ते पुढे सांगतात, 'ज्याप्रमाणे मोठ्या भागात उंचीत झालेली कमतरता आपण पाहिली, त्याचपद्धतीनं छोट्या भागांमध्ये झालेला मोठा बदलही आम्ही पाहिला.' वॅलीचा हा रिपोर्ट ३० ऑक्टोबरला जर्नल ऑफ ग्लेशियोलॉजीमध्ये छापून आलाय.
सध्या संशोधक सॅटेलाइट अल्टीमीटरद्वारे याची सत्यता तपासत आहेत की बर्फाची चादर किती वाढली आणि उंचावर किती परिणाम झालाय. वॅली चिंता व्यक्त करत म्हटलं की, हिमयुगच्या अखेर हवा थोडी आणखी गरम होईल. सोबतच त्यातील आर्द्रता वाढेल जी बेटांना प्रभावित करेल. तसंच ग्लेशियरांवरून बर्फ पडणं सुरू राहिल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.