नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या शेवटी अमेरिका दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींसोबत सहभोजनाची इच्छा दर्शविल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे फोनवर बोलणे झाले आहे. विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाबद्दल ट्रम्प यांनी मोदींचे अभिनंदनही केले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासून दोन्ही नेत्यांमध्ये तीन वेळा फोनवर बोलणं झालं आहे.
मोदींच्या या दौऱ्याची तारीख अजून ठरलेली नाही. परंतू डोनाल्ड ट्रम्प मोदींच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.