...आणि उडत्या विमानात वाढला एक यात्री!

तुम्ही कधी ऐकलं आहे की एखाद्या विमानात लँडिंगवेळी त्या विमानातील प्रवाशांची संख्या टेक ऑफच्या संख्येपेक्षा एकाने जास्त आहे. पण लॉस एंजलिस एअर लाइन्समध्ये असा काही घडले त्यामुळे सर्वजण दंग राहिले आहे. 

Updated: Dec 10, 2014, 07:30 PM IST
 ...आणि उडत्या विमानात वाढला एक यात्री! title=

नवी दिल्ली : तुम्ही कधी ऐकलं आहे की एखाद्या विमानात लँडिंगवेळी त्या विमानातील प्रवाशांची संख्या टेक ऑफच्या संख्येपेक्षा एकाने जास्त आहे. पण लॉस एंजलिस एअर लाइन्समध्ये असा काही घडले त्यामुळे सर्वजण दंग राहिले आहे. 

हो हे खरं आहे, आम्ही मस्करी करीत नाही. मंगळवारी लॉस एंजलेसच्या साउथवेस्ट एअर लाइन्सवर असे काही झाले ते पाहिल्यावर सर्वजण दंग झाले. फ्लाइटमध्ये  विमानात लँडिंगवेळी त्या विमानातील प्रवाशांची संख्या टेक ऑफच्या संख्येपेक्षा एकाने जास्त आहे. 

साधारण कोणत्याही विमानात प्रवासी बसण्यापूर्वी योग्य प्रकारे चेंकिंग केली जाते. आणि प्रवाशांची संख्या निश्चित केल्यानंतर प्रवाशांना विमानात प्रवेश दिला जातो. पण त्या विमानात अचानक एक प्रवासी वाढला. असे सुरक्षा यंत्रणेच्या गडबडीमुळे नाही झाले. ते घडण्यामागे एक गुड न्यूज होती. 

या विमानात एका छोट्या बाळाला जन्म दिला. एअरलाइन्सच्या प्रवक्ता इमिली सॅम्युअल्स यांनी सांगितले की, महिलेसोबत फ्लाइटचे क्रू मेंबर, डॉक्टर आणि नर्स आहेत. तसेच महिला आणि नवजात बालकाची स्थिती चांगली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.