ढाका : युनायटेन लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात उल्फा या संघटनेचा प्रमुख अनुप चेतियाला बांग्लादेशनं भारताच्या स्वाधीन केले आहे. चेतियाला 1997 साली बांग्लादेशमध्ये अटक करण्यात आली होती.
गेल्या 18 वर्षांपासून तो बांग्लादेशच्या जेलमध्ये कैदेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए प्रमुख अजित दोव्हाल यांच्या पुढाकारानं बांग्लादेशच्या जेलमध्ये कैदेत असलेल्या चेतियाला भारतात आणण्यात यश आले आहे. चेतिया हा उल्फाचा संस्थापक सदस्य आणि सरचिटणीस होता. हत्या, घुसखोरी, बनावट पासपोर्ट आणि अवैधरित्या परदेशी चलन बाळगल्याचा चेतियावर आरोप आहे.
अधिक वाचा : दाऊदची झोप उडाली, पाकिस्तान ठार करणार दाऊदला
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला बालीमध्ये अटक झाली. त्यानंतर छोटा राजनला बालीतून भारतात आणण्यात आले. छोटा राजननंतर आता उल्फा संघटनेचा प्रमुख अनुप चेतिया याचा ताबाही भारताला मिळालाय. गेल्या 18 वर्षांपासून चेतिया बांग्लादेशच्या जेलमध्ये कैद होता. अखेर पंतप्रधान मोदीच्या पुढाकारानं चेतियाला भारतात आणण्यात यश आलंय. आधी छोटा राजन, आता चेतियाच्या रुपात मोदी सरकारला मोठं यश मिळालंय. त्यामुळं मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नंबर कधी असा प्रश्न उपस्थित होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.